- प्रशिक्षकाकडून खेळाडू तरुणीचा विनयभंग; बालेवाडीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२१) :- “तू शुक्रवारी खेळायला का येत नाहीस? तू चांगली खेळाडू आहेस, मला तुझा खेळ फार आवडतो. मला तुला फार वरती घेऊन जायचं आहे. तू आज देखील चांगली खेळली आहेस,” असे म्हणत आरोपीने शेकहॅन्डसाठी हात पुढे केला.
प्रशिक्षक असल्याच्या नात्याने कौतुक करत असतील म्हणून पीडित मुलीने हात पुढे करून हातात हात मिळवला. तेव्हा, आरोपीने मुलीला मिठीत घेतले. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने तेथून निघूण जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी हा पीडितेला थांबविण्याचा प्रयत्न करत होता असे तक्रारीत म्हटलं आहे.
या घटनेची माहिती पीडित मुलीने आईला दिली. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास बालेवाडी येथे ही घटना घडली. हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रशिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रशिक्षक राकेश यशवंत दलाल (३६) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून मुलगी बॅडमिंटनचे शिक्षण घेत होती.