न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जाने.) :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघ यांच्या वतीने मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त पिंपरी कॅम्प, शगून चौक या ठिकाणी शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर व शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या शुभ हस्ते प्रतीमेस गुलाबाच्या पाकळ्या अर्पण करून, शिवसेना पुणे जिल्हा महिला संघटिका सुलभा उभाळे यांच्या हस्ते पेढे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटील, बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के, माऊली जाधव, दत्ता गिरी, गणेश पाडूळे, निलेश भोरे, सागर शिंदे, दिपक कांबळे, महेश गूळगोंडा, अमित आहेर, दत्ता क्षिरसागर यांच्यासह शिवसेना शहरप्रमूख योगेश बाबर, कामगार नेता इरफान सय्यद, हरेश नखाते आदी शिवसेना नेते उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निम्मिताने युवराज दाखले यांनी पिंपरी विधानसभेमध्ये शिरकाव करून, वातावरण निर्मितीस प्रारंभ केला आहे. मी ही या विधानसभेच्या जागेसाठी प्रमुख दावेदार असल्याचे आव्हान त्यांनी पक्ष नेतृत्वासमोर उभे केले असल्याचे, पहावयास मिळत आहे.











