न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव (दि. २४ जाने.) :- थेरगाव मधील बापूजीबुवा मंदिर परिसरातील महापालिकेच्या उद्यानात १० कावळ्यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. सकाळच्या वेळेस बागेत फेरफटका मारण्यास गेलेल्या तरुणांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी प्रभागातील नगरसेवक कैलास बारणे यांना ही घटना कळविली.
बारणे यांनी ताबडतोब महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागास घटनास्थळी बोलावले व त्यांना पुढील कार्यवाही करण्यास सांगितली. कर्मचाऱ्यांनी सर्व कावळ्यांना शव विच्छेदनासाठी औंध येथील शासकीय पशु वैद्यकीय उपचार विभागात पुढील तपासणीसाठी घेऊन गेले.
कावळ्यांना वीषबाधित अन्न पदार्थ टाकले असल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी पशु वैद्यकीय उपचार विभागाच्या वतीने वर्तविण्यात आलेला आहे. नगरसेवक कैलास बारणे यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.











