न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जाने.) :- लेखणीला ग. दि. माडगूळकर यांचे आशीर्वाद लाभलेले ज्येष्ठ साहित्यिक सुरेश त्र्यंबक पाठक वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करीत आहेत. यानिमित्त त्यांनी लिहिलेल्या दोन कथासंग्रहांचा प्रकाशन समारंभ येत्या (दि. २७) रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत हॉटेल रोझवूड सभागृह, थेरगाव येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. रसिकांनी या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















