- आगीत मोठे नुकसान; एक जवान किरकोळ जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. डिसेंबर २०२१) :- रावेतच्या डॉमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरी आउटलेटला आज गुरुवारी (दि. २३) सकाळी आठच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळाले.
अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र आणि प्राधिकरण येथील उपकेंद्राच्या दोन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने घटनेत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन विभागाच्या एका जवानाला किरकोळ जखम झाली आहे.
बुधवारी रात्री इलेक्ट्रिक मोटर चार्जिंगला लावली असता त्या मोटरची बॅटरी ओव्हरहिट झाली आणि त्यामुळे आग लागली. ही आग संपूर्ण आउटलेटमध्ये पसरली होती.
















