- यात ४ पुरुष, २ महिला व एक लहान मुलीचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. २३) रोजी ओमीक्रोनचे ०७ नवीन रुग्ण आढळले आहेत. ०७ पैकी ०४ पुरुष, ०२ महिला व एक लहान मुलगी आहे. या रुग्णांपैकी ४ रुग्ण नवीन भोसरी रुग्णालय व ३ रुग्ण खाजगी रुग्णालयमध्ये दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
एकूण ५३ कोविड १९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ३५ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ तपासणी करण्यात आली असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन या रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाश्यांची कोविड 19 तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.


















