- मुद्देमालासह आणखी एकावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२१) :- तळवडे येथे टपरीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान छापा मारून कारवाई केली.
आरोपीच्या टपरीमधून ७९ हजार ६१३ रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. एका आरोपीने दुसऱ्या आरोपीला गुटखा पुरवला असल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक भगवंता मुठे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलीप चंदीप्रसाद यादव (वय १९, रा. तळवडे) असे अटक केलेल्या आरोपींच नाव आहे. त्याच्यासह निलेश (रा. शिवाजी चौक, रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
















