- वाकडमधील घटना; आरोपी रेकाॅर्डवरील गुन्हेगार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२१) :- लोखंडी कोयता हातात घेऊन डेअरी फार्मसमोर भूमकर चौक ते डांगे चौक रोड, वाकड येथे मोठमोठ्याने आरडाओरडा करून आरोपी दहशत पसरवित असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी (दि. २४) पावणेदहाच्या दरम्यान पोलिसांनी कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून कोयता जप्त केला. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता शेअरचॅटवरून डाऊनलोड केलेला पिस्तूलचा व्हिडिओ त्याने व्हाटसअप स्टेटसला ठेवला असल्याचे पोलिसांना दिसून आले. आरोपी हा पोलीस रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे.
पोलीस कर्मचारी अतिक शेख यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कृष्णा तुळशीराम राऊत (वय २२, रा. काळाखडक, वाकड, मूळ रा. वाशी, ता. भूम, जि. उस्मानाबाद), असे अटक केलेल्या ‘भाई’चे नाव आहे. वाकड पोलिस पुढील तपास करीत आहे.