- एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२१) :- दुचाकीवरून शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या दरम्यान घरी जात असताना मोशी येथील मैत्री दरबार हॉटेल येथे सेवा रस्त्यावर आरोपीने बॅरीगेट लावून रस्ता अडवला. फिर्यादी यांनी त्याला बॅरीगेट काढण्यात सांगितले. ‘तू इथून जायचे नाही’ असे आरोपीने म्हटले.
फिर्यादी स्वतः बॅरीगेट काढत असताना आरोपीने त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून कोयत्याने डोक्यात, कानावर वार करून गंभीर दुखापत केली. अन्य दोन आरोपींनी देखील फिर्यादीला शिवीगाळ करून दमदाटी केली. फिर्यादी यांना काठीने मारून दुखापत केली. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले.
सचिन धनराज पवार (वय २८, रा. आदर्शनगर, मोशी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भूषण बहिरट (रा. गंधर्वनगरी, मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.