न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२२) :- आर्थिक फायद्यासाठी स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
ही कारवाई रहाटणीतील अजिंक्य तारा स्पा सेंटर, रहाटणी येथे गुरुवारी (दि. २४) येथे करण्यात आली. वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तानाजी मारुती जाधव (वय २६, रा. रहाटणी, मुळगाव – म्हाडा, सोलापूर) असे अटक केलेल्या स्पा सेंटर चालकाचे नाव आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.












