न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२२) :- चिंचवडगाव येथील महापालिकेच्या तालेरा रूग्णालयाला शनिवारी (दि. २१ ) दुपारी चार वाजताच्या दरम्यान आग लागली. आग लागताच अग्नीशामन विभागाला त्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे वेळेतच आग नियंत्रणात आली. यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
परिसरातील विज पुरवठा सकाळापासून खंडीत झाला होता. त्यामुळे रूग्णालयातील विद्युत यंत्रणा बॅटरीच्या साह्याने सुरू होती. यामुळे बॅटरीवर ताण आला आणि शॉर्ट सर्किट झाले. यातून आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रसूती झालेल्या पाच महिला रूग्णालयात दाखल होत्या. त्वरीत त्यांना बाहेर काढून त्यांना थेरगाव रूग्णालयात दाखल करण्यात आले. तालेरा रूग्णालयात शनिवार हा सुट्टीच्या दिवस असल्यामुळे रूग्णांची गर्दी नव्हती.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशमन विभागाचे तीन बंब घटना स्थळी दाखल झाले. दहा ते पंधरा मिनीटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. खबदरारी म्हणून तीन बंब पाठविण्यात आले होते. परंतु एका अर्धा बंबातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.