- आगामी महापालिका निवडणुकीचे फुंकले रणशिंग…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२२) :- शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियानाचा झंझावात चालू आहे. या अभियानांतर्गत (दि. २७) काळेवाडी व रहाटणी विभागाची बैठक हरेश आबा नखाते यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली.
या बैठकीला नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिवसेना समन्वयक वैभव वाघ, जत संपर्कप्रमुख तानाजी गुरव, व्याख्यात्या विद्या घोडे, शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले, उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, उपसंघटिका शारदा वाघमोडे व काळेवाडी रहाटणीतील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
या बैठकीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसैनिकांसोबत चर्चा करून त्यांचे प्रश्न व अडचणी समजून घेतल्या. शिवसैनिकांना संघटनात्मक पातळीवर येत असलेल्या सर्व समस्या मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील याची ग्वाही दिली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोलाचे मार्गदर्शन केले.