न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातील अनाधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी पालिकेने विशेष मोहिम हाती घेतलेली आहे. या मोहिमेसाठी ३० जुन २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनाधिकृत नळजोडधारकांना नागरी सुविधा केंद्रमध्ये अर्ज दाखल करावेत.
मुदतीत नागरिकांनी नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज सादर करून नळजोड नियमित करुन घेतले नाही तर त्यानंतर असे अनधिकृत नळजोड़ तोडण्याची कारवाई हाती घेऊन अशा अनाधिकृत नळजोडधारकांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
नळजोड नियमित करण्यासाठी ग्राहकांकडून रहिवासाचा पुरावा आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हींग लायसन्स, पॅन कार्ड, मनपाची मिळकत बिल, लाईट बिल यापैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.















