न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२२) :- दोघे दुचाकीवरून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून देहूरोड येथून निगडीला जात होते. गार्डन सिटी समोर आल्यानंतर आरोपीने कार भरधाव वेगात चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात दोघांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.
फिर्यादी यांचे चुलते सखाराम शिंदे (वय ८० ) आणि त्यांचे मित्र नरसिमन हेनरसिमन गुंडराम (वय ८३ , दोघे रा. मामुर्डी, देहूरोड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
ही घटना गुरुवारी (दि. १४) सकाळी पावणे अकरा वाजता घडली. सागर नेताजी शिंदे (वय २९ , सिद्धार्थनगर निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.