न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२२) :- कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुणाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली आहे. अक्षय अमोल माटेगावकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सुसगाव येथे आज शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान घडली.
अक्षय हा त्याच्या आई – वडील, बहिणीसह सुसगाव परिसरात राहात होता. सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तो शिकत होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली.
चिठ्ठीत त्याने मला नोकरी मिळणार नाही, मी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करु शकत नाही, मी माझे आयुष्य संपवत आहे, असे लिहिले आहे. गायिका केतकी माटेगावकरचा तो चुलत भाव होता. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.














