न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२२) :- फेसबुकच्या माध्यमातून आरोपी आणि फिर्यादी यांची एकमेकांशी ओळख झाली. फिर्यादी यांचा घटस्फोट झाला आहे. त्याद्वारे आरोपीने फिर्यादी सोबत जवळीक साधून फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या घरी, हॉटेलवर नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला.
ही घटना जानेवारी २०१८ ते जुलै २०२२ या दरम्यान सांगवी, विमाननगर, बालेवाडी येथे घडली. ३७ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजय रमेश बोतालजी (वय ४७, रा. बिबवेवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या फेसबुक फ्रेंडचे नाव आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.