न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२२) :- ”तू मोहसीन चौधरी याच्या गोडाऊनमधून माझ्या नावाने गाडी का भरून नेली ”असे विचारले असता तू मला विचारणार कोण असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादीनेही त्याला शिवीगाळ केली.
याचा राग मनात धरून आरोपी हे फिर्यादीच्या जाधववाडी येथील घरात शिरले. शिवीगाळ करीत केस पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ९० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या वस्तू चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना चिखली येथे घडली. या प्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन जालिंदर फड (वय२३), जालिंदर बन्सी फड (वय ५०), जालिंदरचा मुलगा, चार महिला व एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. जाधववाडी , चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.