न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२२) :- बंदी असलेले प्लास्टिक वापरणा-या आस्थापनांवर कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी ग्रीन मार्शल पथकांना आदेश दिले होते. त्या अनुंषगाने ग्रीन मार्शल पथकाने (दि. २०) दवाबाजार चिंचवड येथील सात अस्थापनावर बंदी असलेले प्लास्टिक वापरल्या प्रकरणी र.रू.४०,०००/- दंडात्मक कारवाई केली. २० किलो प्लास्टिकही जप्त केले.
मुख्य बाजारपेठेत दैलत ट्रेडर्स या आस्थापनेवर कारवाई करून १५० किलो बंदी असलेले प्लास्टिक (दि. २१) जप्त केले. तसेच संबधित अस्थापनेवर दंडात्मक कारवाई केली.
आज (दि. २२) बाणेर येथील नामांकीत हॉस्पीटलने पिंपरी डेअरी फ्रार्म रस्त्यावर त्यांचे बायोमेडिकल वेस्ट टाकल्याचे निदर्शनास आले. संबंधितावर ३५,००० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. बायोमेडिकल वेस्टही त्यांच्याकडून उचलुन घेण्यात आले. ह क्षेत्रीय आरोग्य विभागाच्या सहकार्याने ग्रीन मार्शल पथकाने ही कारवाई केली. तसेच आज शाहूनगर, चिंचवड येथील नामांकीत हॉस्पीटलने आपला बायोमेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकल्या प्रकरणी संबंधीतावर ३५,००० रुपयांची दंडात्मक कारवाई अ क्षेत्रीय आरोग्य विभागाच्या सहकार्याने केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी, अंमलदार , महाराष्ट्र सुरक्षा बल जवान आणि तृतीय पंथीय पथके यांचा समावेश असलेल्या ग्रीन मार्शल पथकाकडून या कारवाया करण्यात आल्या.














