- दोन दिवसात वेबसाईटवर मतदार याद्या उपलब्ध करण्यात प्रशासन अपयशी; निवडणूक आयोगाकडे तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक विभागाला २१ जुलै २०२२ ही अंतिम मतदार यादी प्रसिद्धीची मुदत होती. परंतु पुन्हा महानगरपालिका निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला असून वेबसाईटवर मतदार याद्याच उपलब्ध करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे, असा आरोप भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी केला आहे.
या संदर्भात विलास मडिगेरी यांनी आज २२/७ रोजी मेलव्दारे भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकरी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतिम मतदार यादी पब्लिश करण्याचा दि २१/०७/२०२२ महानगरपलिका वेबसाइटवर दिसणे नियमानुसार आवश्यक होते. असे असताना आज शुक्रवार दिनांक २२/ ०७/२०२२ सायंकाळी ६.४० वाजेपर्यंत प्रारूप मतदार उपलब्ध होती पण अजिबात ओपन होत नव्हती आणि ८.०५ वाजता प्रभागवाइज अंतिम मतदार नावांची यादी फक्त दिसत होती पण तीही अजिबात ओपन होत नव्हती. २४ तास झाल्यानंतरही महानगरपलिका वेबसाइटवर किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर पब्लिश झाली नाही. तसे साईटवर आत्तापर्यंत दिसून येत नाही. आम्ही दिवसभर खूप वेळा महानगरपलिका वेबसाइट उघडून पहिली तर ओपन होत नाही. हा विषय गंभीर असल्याने तक्रारी दखल करून घ्यावी. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाच्या नियमांचा भंग झाला आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. यासाठी आम्ही मुदतवाढ दया म्हणून मागणी केली होती. या माझ्या गंभीर तक्रारीकडे सर्वानी कानाडोळा करून दुर्लक्ष केले आहे. आज मतदार यादी जाहीर करण्याच्या २४ तासानंतरही मतदार यादी जाहीर झाली नाही. हे अत्यंत चुकीचे आहे.
मतदार याद्यांचा संपूर्ण शहरामध्ये प्रचंड गोंधळ आहे आणि लाखों मतदारांचे नावे सेक्शन हेडच्या अटीमुळे या संदर्भातील तक्रारी आहेत. यासाठी निष्पक्ष मतदार यादी तयार व्हावी तसेच ज्या ठिकाणी जो मतदार राहतो आहे त्याचेकडे राहत्या पत्यावर अनेक वर्षापासून पुरावा आहे. ज्या हरकती सादर आहेत त्याला राहत असलेल्या प्रभागातील उमेदवाराला मतदान करण्याच्या हक्कापासून वंचित करण्यात येत आहे. तसेच स्थानिक ज्या त्या प्रभगातील उमेदवाराला मतदान घेण्यापासूनही मनाई होत आहे. म्हणून २ आठवडे मुदतवाढीची मागणी आम्ही सर्वाना केली होती. राज्य निवडणूक आयोगाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे.
महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील. अतिरिक्त आयुक्त – २ जितेंद्र वाघ, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांना लेखी पत्र देवून फोन करून प्रत्यक्ष भेटून विनंती केली. या सर्वानी माझ्या या गंभीर विषयाकडे लक्ष्य देवून मुदतवाढ मागणिकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. माझ्या प्रभागतील ६७५५ मतदारांच्या हरकती मुदतीत ०३/०७/२०२२ रोजी दाखल केल्या होत्या. महानगरपालिका मिळकतकर बिल कॉपी ७१०५ एकूण पानंक व ३५५० पेज झेरॉक्स या हरकतीबरोबर जोडल्या होत्या. आज शुक्रवार (दि. २२) रोजी सायंकाळी ७.०७ पर्यंत महानगरपालिका व राज्य निवडणूक आयोग या दोघांच्या वेबसईटवर दिसून येत नाही. प्रशासनाच भोंगळा कारभार यातून दिसून येत आहे. आयोगाच्या नियमांचा भंग झालेला आहे तसेच आम्ही दिलेल्या हरकती प्रमाणे नावे योग्य त्या वार्डात बदल नाही झाल्यास या विरोधात मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात मतदार यादीवर वेगळी याचिका दाखल करावी लागेल, असे मडिगेरी यांनी म्हटले आहे.














