न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२२) :- राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन संत तुकारामनगरमध्ये करण्यात आले होते. रक्तदात्यास झाडाचे रोप वाटप करण्यात आले. युवक, विशेषतः महिला व युवतींनी देखील रक्तदान केले. शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनास अजित गव्हाणे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिं.चिं., विलास लांडे पाटिल माजी आमदार भोसरी विधानसभा, योगेश बहल माजी महापौर, संजोग वाघेरे माजी महापौर, भाऊसाहेब भोईर, नाना काटे मा. विरोधी पक्षनेते पिं.चिं.म.न.पा, फजल शेख माजी सभापती शिक्षण मंडळ, विभागीय महिला अध्यक्ष वैशालीताई नागवडे, कविता आल्हाट महिला शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिं.चिं.शहर, शीतल हगवने, लोचन शिवले, ज्योती गोफने, मेधा पळशिकर, बबन गाढवे, ज्ञानेश्वर कांबळे, स्वप्निल डोळस, नेहा पडवळ, मेहेक ईनामदार, शुभदा पवार, आदि उपस्थित होते.