- शिवसेनेच्या विभाग संघटिका सुजाता नखाते यांचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०२२) :- शिवसेनेच्या काळेवाडी-रहाटणी विभाग संघटिका सुजाता हरेश नखाते यांच्या वतीने काळेवाडी येथे नागपंचमी सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक खेळ खेळून साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपसंघटिका शारदा वाघमोडे, उपसंघटिका तस्लिमा शेख, शाखाप्रमुख मीनाक्षी वराट, शाखा प्रमुख नंदिनी करे, शाखा प्रमुख सुषमा बोरकर, अरुणा सुरवसे, भावना ढमाले ,संगीता माने, सुनीता बीक्कड, गायत्री विटकर, राजश्री गायकवाड, कविता मंजाळ, सविता जाधव, नीता खामितकर, प्रेमा लिंबापुरे, चंद्रिका साळुंखे, मुक्ता पवार, सुरेखा शिंदे, शकुंतला जाधव, सौ. मुंज, कार्तिकी ढमाले, स्वरा पवार, भारती तोडकर, राणी बिकड, स्वाती नायकवडे यांच्यासह काळेवाडीतील असंख्य महिला उपस्थित होत्या.
यावेळी महिलांनी नागदेवतेची मनोभावे पूजा केली. त्यानंतर महिलांनी पारंपरिक खेळ, झिम्मा फुगडी, फेर, नाच, गाणी म्हणत आनंदाने सण साजरा केला.















