- बेकायदेशीर वृक्षतोड केल्यास प्रतीवृक्ष पन्नास हजारांचा दंड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०२२) :- अनधिकृतपणे वृक्ष काढण्यास आळा बसण्यासाठी दंडाची आकारणी करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आकुर्डीतील मे. फॉरमायका कंपनीने तब्बल ९० झाडे विनापरवाना काढले होते. प्रत्येक वृक्षासाठी रक्कम रुपये ५०,००० / – इतक्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने कंपनीकडून रु ४५,००,०००/- (पंचेचाळीस लाख) दंड (दि. २८/०७/२०२२) वसूल करण्यात आलेला आहे.
तसेच प्रभाकर न्यालकंठी यांनी २ झाडे विनापरवाना काढले आहेत. त्या प्रकरणी त्यांच्याकडून १,००,००० /- (एक लाख) (दि २७/०७/२०२२) दंड वसूल करण्यात आलेला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी प्रसिद्धीस दिली आहे.















