- जुगार खेळणाऱ्या २६ जणांना ठोकल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०२२) :- देहुगाव ते येलवाडी रस्त्याच्या उजव्या बाजूस एस.एच. ई. पी.एल हेव्ही इंडस्ट्रीयल फ्यब्रिक्रेशन लिमिटेड कंपनीच्या दुसर्या मजल्यावर २० ते २५ जण टेबलावर तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली.
मंगळवारी (दि. २) ऱात्री उशीरा पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी पाच लाख ३३ हजार २७० रुपये, २ कार १८ दुचाकी व २७ मोबाईल व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण ३५ लाख दहा हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेखर गुलाब परंदवड (वय ५० रा. देहुगाव) व इतर २५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.















