न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शनिवार (दि. ०६) रोजी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी (दि. ०७) सकाळचा पाणीपुरवठा देखील कमी दाबाने होणार आहे.
रावेत येथे पालिकेचे अशुध्द जलउपसा केंद्र आहे. भोसरीला आणि चिचवडला जोडलेल्या पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. दुरुस्तीचे काम तातडीने करणे अत्यावश्यक आहे. ही गळती थांबविण्सायाठी शनिवार (दि. ०६) रोजी भोसरी, भोसरी गावठाण, इंद्रायणी नगर, बो-हाडेवाडी, मोशी, च-होली, डुडळगाव, दिघी, संत तुकाराम नगर, मॅगझीन परिसर, बोपखेल, प्रेमलोक पार्क, चिचवडगाव, पवना नगर, रस्टन कॉलनी, सुदर्शन नगर, प्रा. रामकृष्ण मोरे परिसर, पिंपरीगाव, पिंपरी नगर, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, दापोडी, जुनी सांगवी, नवी सांगवी, नेहरुनगर, वल्लभनगर, कासारवाडीचा रेल्वेगेटवरील परिसर, प्राधिकरण से. क्र. २३ आणि २६, सिध्दीविनायक नगरी, वाहतूकनगरी आदी भागाचा दुपार / संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.
तसेच दुस-या दिवशी रविवार (दि. ०७/०८/२०२२) रोजी सकाळच्या वेळापत्रकानुसार होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.