- स्पार्क मिंडा ग्रुप व आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंचचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑगस्ट २०२२) :- हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे व्हिल चेअरपासून वंचित राहिलेल्या कुदळवाडीतील एका दिव्यांग युवा नागरीकाला आमदार श्री पै महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पार्क मिंडा कंपनीच्या सीएसआर फंडातून व्हिलचेअर मिळवून दिले. या नागरीकाचे उर्वरित आयुष्य काहीसे सुखकर झाले असल्याने या नागरीकाच्या कुटूंबियांनी आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंचाचे अध्यक्ष तथा माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांचे आभार मानले आहेत.
यावेळी दिनेश यादव, सोमनाथ यादव, दिपक घन, रवी गौतम,अरबाज खान, रामकुमार पासवान, गौरव त्रिपाठी, सौरभ त्रिपाठी, मुजफ्फर सिद्दिकी उपस्थित होते
याबाबत माहिती देताना माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव म्हणाले, कुदळवाडी परिसरात राहणारे २७ वर्षीय मोहम्मद शाबीर यांना दोन्ही पायांनी चालता येत नव्हते. त्यामुळे त्यांना हिंडणे फिरणे मुश्किल झाले होते. या परिस्थितीमुळे त्यांच्यात दिवसेंदिवस नैराश्य दिसून येऊ लागले होते. या गंभीर समस्येचा विचार करून आणि त्यांना हिंडता फिरता यावे या उद्देशाने व्हिलचेअर मिळवून दिली. या व्हिलचेअरमुळे मोहम्मद शाबीर यांच्या भावी आयुष्यासाठी मोठा आधार मिळाल्याची भावना त्यांनी बोलुन दाखवत आभार मानले.