न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२२) :- ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा प्रारंभ क्रांतीदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी आज रविवारी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो सरचिटणीस दिनेश यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयात भोसरी विधानसभा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यात विविध सूचना देत सर्वांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका वैशाली खाडे, अमित गुप्ता, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंंधे, उदय गायकवाड, शिवराज लांडगे, राजेश डोंगरे जयदिप कर्पे, पंकज शर्मा, विक्रांत गंगावणे, प्रकाश चौधरी, अतुल सोनकांबळे, दिपक घन, शाम थोरात, स्वराज पिंजण, मनोज मोरे, विलास यादव, आकाश रोकडे, राहुल तापकीर, मिलींद रोकडे, अमित महाडीक, दत्तात्रय वाळके, मनोज मापारी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
















