न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२२) :- बिहार येथील मुजफ्फरपूर पोलीस ठाण्यात कविता कुमारी कार्यरत होत्या. कविता कुमारी विवाहित होत्या. एका गुन्ह्यातील आरोपीच्या तपासासाठी चार पोलिसांचे पथक बावधन येथे आले होते. त्या पथकात कविता कुमारी देखील होत्या.
हे पथक एका हाॅटेलवर थांबले होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास कविता कुमारी यांनी हाॅटेलमध्ये गळफास घेतल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.


















