न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२२) : – मोशी येथील प्रभागामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा या अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णसंचय बचत गट महासंघाचे अध्यक्ष अर्चना राजेश सस्ते यांच्यावतीने तिरंगा झेंडा वितरण नागरिकांना करण्यात येत आहे.
मोशी परिसरातील प्रत्येक सोसायटीमध्ये जनता संपर्क कार्यालयामध्ये तिरंगा झेंडा वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि देशाच्या आनंदामध्ये व आम्ही सर्व भारतीय एक आहोत याचा अभिमान बाळगावा. दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये तिरंगा फडकावून आपल्या घरी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी समारंभाचा आनंद व्यक्त करावा, असे आवाहन अर्चनाताई यांनी केले आहे.
घरोघरी तिरंगा या अभियानाचे उद्घाटन भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे, अण्णासाहेब मगर बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक राजेश सस्ते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ग्रामदैवत नागेश्वर महाराजांच्या दर्शनाने या मोहिमेचे उद्घाटन आमदार लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.