न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२२) :- एकमेकांच्या शेजारी राहणारे फिर्यादी व आरोपी यांच्यात पूर्वीपासून भांडणे आहेत. दरम्यान, फिर्यादी हे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम करीत असताना आरोपींसोबत ड्रेनेज लाईन टाकण्यावरून वाद झाला.
यामध्ये आरोपींनी फिर्यादीसह त्यांचा भाऊ व आई यांना काठी, रॉड व दगडाने बेदम मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. हा प्रकार डुडुळगाव येथे घडला. नीतेश बाळासाहेब वायदंडे (रा. भीमनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार स्वप्नील सुखदेव कदम, सागर सुखदेव कदम, सुखदेव सीताराम कदम (सर्व रा. अण्णाभाऊ साठेनगर चौक, डुडुळगाव) यांच्यासह आणखी दोन महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.


















