न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२२) :- गणेशोत्सवनिमित्त चिंचवडगाव, केशवनगर येथे रविवारी (दि. ४) ओरिएंटल मार्व्हल सोसायटीच्या वतीने सलग ७ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमास महिला व पुरुषांनी भरगोस प्रतिसाद दिला. तब्ब्ल ७५ बॅगचे रक्त संकलित झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त ७५ बाटल्यांचे रक्तदानाचे उद्दिष्ट साध्य झाले. वायसीएम रक्तपेढी डॉ. मुसर्गी यांच्या साहाय्याने हे रक्तदान शिबिर संपन्न झाले.
यंदाचे रक्तदान शिबिराचे हे सलग ७ वे वर्षे आहे. यात सोसायटी चे अध्यक्ष विशाल कुलकर्णी, सचिव साकेत भलगट, खजिनदार संतोष पाटील, सुनिल कांदळकर, अभिजीत बाबर, वरून कुलकर्णी, सुभाष जोशी, अभिजीत मांगले, हेमंत देशमुख, मनोज सग्रि, शाम कापरे, राजन पाटील, गणेश ओव्हाळ, मारुती पाटील, योगेश लंके, ओव्हाळ व सोसायटीतील सदस्य तसेच ओम निसर्ग मंडळ यांचे सहकार्य लाभले.















