न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ सप्टेंबर २०२२) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरी, चिंचवड व भोसरीतील गणपती मंडळांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले. अजितदादा पवार यांचे पिंपळे गुरव नगरीत माजी शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप व उपाध्यक्ष तानाजी जवळकर यांनी स्वागत केले.
अजितदादा पवार यांनी पिंपळे गुरवमधील सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव मंडळ अनंतनगर मित्र मंडळाला भेट दिली. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गणरायाची पूजा करून गणरायाची आरती केली व सत्यनारायणाचा महाप्रसाद घेतला. यावेळी महिलांनी अजितदादांचे औक्षण केले. यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व महिलांच्या हस्ते फुले पगडी, पांडुरंगाची मूर्ती, उपरणे, श्रीफळ देऊन अजितदादा पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, माजी नगरसेवक राहुल जाधव, माजी नगरसेवक विनायक सुभे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपळे गुरव महिलाध्यक्षा तृप्तीताई जवळकर, माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे, पै. गणेश जगताप, हितेश जाधव, तसेच आनंदनगर मित्र मंडळातील सर्व सभासद, महिला आदी उपस्थित होते.
शहीद भगतसिंग चौकातील भैरवनाथ मित्रमंडळाच्या गणरायाची आरती अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. बाळासाहेब काशीद, शंकरतात्या जगताप, सुमित काशीद, आशिष जाधव, अतुल काशीद यांच्या हस्ते अजितदादा पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीजेवर ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणे लावून एकच जल्लोष केला.
याबरोबरच अजितदादा पवार यांनी सुर्यमुखी गणेश मंदिराला भेट देऊन गणरायाची आरती केली. मंडळाच्या वतीने विठ्ठल, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांची संयुक्त मूर्ती, उपरणे, श्रीफळ देऊन अजितदादा पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दामूअण्णा काशीद, मधुकर काशीद, सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, पै. गणेश मधुकर काशीद, गणेश पोपट काशीद, तुषार काशीद, संतोष काशीद, भाग्यश्री काशीद, मीराताई असवले, अश्विनी जगताप, इंद्रायणी देवकर, संतोष देवकर, शंतनू डोळस, आदेश जगताप, अक्षय जगताप, निखिल जगताप, सौरभ जगताप, गणेश जगताप, मंडळाचे कार्यकर्ते, पिंपळे गुरव ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
अजितदादा म्हणाले, पिंपळे गुरव परिसरात शामभाऊ जगताप, तानाजी जवळकर चांगले काम करीत असून, राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा समर्थपणे पेलत आहेत. शेतकऱ्यांवर मोठे संकट आहे. मात्र, या संकटातून निश्चित मार्ग निघेल. कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडला आहे. गणेशोत्सवाला गालबोट न लागू देण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले आहे, ही उल्लेखनीय बाब आहे.
















