न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ सप्टेंबर २०२२) :- चिंचवडगावातील चापेकर चौक येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश मंडळासाठी स्वागत मंडप उभारण्यात आला आहे. यावेळी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि त्यांच्या पत्नी गणेश मंडळांच्या स्वागतासाठी उपस्थित होत्या.
यावेळी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, राजेंद्र वाघ, उल्हास जगताप, पोलीस अधिकारी कवडे या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. चाफेकर चौक येथे रात्री सव्वा आठ वाजता पाच छोटे मंडळे व एक नवतरुण मित्र मंडळ मित्र मंडळाचे आगमन चापेकर चौक येथे झाले होते.
















