न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १५ सप्टेंबर २०२२) :- ओला कचरा व्यवस्थापनाबाबत घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सोसायट्यांना आवश्यक तेवढा वेळ देण्यात यावा. शिवाय ओला कचरा व्यवस्थापना संदर्भात योग्य तो मार्ग काढून कायमस्वरूपी तोडगा काढावा.
तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रखडलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशा आशयाचे निवेदन माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे. यावेळी माजी महापौर उषा ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सागर अंघोळकर, उषा मुंढे उपस्थित होते.
दरम्यान ओला कचरा व्यवस्थापनाबाबत योग्य तो निर्णय घेऊन कुठलीही कठोर कारवाई करणार नाही. कार्यवाहीसाठी आवश्यक तेवढा वेळ सोसायटी वर्गास उपलब्ध दिला जाईल, असे आश्वासन पालिका आयुक्तांनी यावेळी दिले.











![[ओला कचरा व्यवस्थापन]*** ओला कचरा व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी सोसायट्यांना वेळ द्या...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/PRATIBHA-90x60.jpg)
![[ओला कचरा व्यवस्थापन]*** ओला कचरा व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी सोसायट्यांना वेळ द्या...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/61af11e9-b428-4c66-8835-0819ed990771-90x60.jpg)





