- दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी; मोशीतील घटना…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२२) :- बांधकाम सुरू असलेल्या दुमजली इमारतीच्या प्लास्टरचे काम सुरू होते. त्यावेळी भिंतीचा काही भाग बाजूला असलेल्या सिमेंटच्या पत्र्याच्या खोलीवर कोसळला. यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोनजण जखमी झाले. ही घटना मोशी येथील तापकीरनगर येथे साईकृपा कॉलनीमध्ये गुरुवारी (दि. १५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली.
उत्तम नारायण मोरे (वय ३३, रा. साई कॉलनी, तापकीरनगर, मोशी) आणि मेहबूब (वय ३०) अशी मृत्यू झालेल्ल्यांची नावे आहेत. एमआयडीसी भोसरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईकृपा कॉलनीमध्ये तात्याराव बाबूराव जाधव यांचे घर आहे.
या घराच्या वरच्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे. गुरुवारी भिंतीचे प्लास्टर सुरू होते. यावेळी अचानक भिंतीचा काही भाग कोसळला. ही भिंत बाजूला असलेल्या एका खोलीच्या सिमेंटच्या पत्र्यावर पडली. यावेळी उत्तम आणि मेहबूब यांच्यासह आणखी दोनजण खोलीत बसले होते. भिंत पडून जखमी झाल्याने उत्तम आणि मेहबूब यांचा मृत्यू झाला.











![[अपघात]*** बांधकामादरम्यान प्लास्टरचा मलबा घराच्या भिंतीवर पडला..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/images-2-7-90x60.jpg)
![[अपघात]*** बांधकामादरम्यान प्लास्टरचा मलबा घराच्या भिंतीवर पडला..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/IMG_6940-90x60.jpg)





