न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२२) :- कंपनीतील काम संपल्यानंतर फिर्यादी आणि आणखी एकजण दुचाकीवरून घरी जात होते. तळेगाव-चाकण रस्त्याने जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील कंटेनर जोरात चालवून फिर्यादीच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
त्यात कंटेनरच्या उजव्या चाकाखाली आल्यामुळे चिरडून त्यातच एकाचा मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी (दि. १९) रात्री तळेगाव-चाकण रस्त्यावरील म्हाळुंगे येथे घडला. अभिमन्यू केशव प्रधान (वय ३६, रा. लांडेवाडी, भोसरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
रामेश्वर अच्युतराव हळदे (वय ५१, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. कंटेनर चालक भुलन सितलाप्रसाद बिंद (वय ४२, रा. नवी मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.