- शिवसेना उपशहर प्रमुख हरेश नखाते व सुजाता नखातेंचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- शारदीय नवरात्र उत्सवाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरेश नखाते आणि विभाग संघटिका सुजाता नखाते यांच्यावतीने महिलांसाठी नवरात्री नवरंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विविध नऊ रंगाचे पारंपरिक वेशभूषा (साडी) परिधान करुन महिला स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक ग्रुपला भेटवस्तू दिली जाणार आहे. नवरात्रीनिमित्त स्त्री शक्तीचा जागर सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी काही नियम आहेत. स्पर्धेत एका ग्रुपला एकच दिवस सहभागी होता येईल. एकच रंग निवडता येईल आणि एका महिलेला एका ग्रुपमध्येच सहभागी होता येईल. ग्रूपमध्ये ११ पेक्षा जास्त महिला नसाव्यात. कमीत कमी ५ महिला असाव्यात.
गृहनिर्माण सोसायटी, कॉलनी, बचत गट, ग्रुप बनवून सहभागी होऊ शकतात. तारखेनुसार ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या रंगाची वेशभूषा असणे आवश्यक आहे. महिलांचा ग्रुप फोटो त्यांच्या ग्रुपच्या ठिकाणी सुजाता हरेश नखाते यांच्यासोबत काढण्यात येईल. ग्रुप मधील सहभागी महिलांच्या नावाची यादी मोबाईल क्रमांकसह बनवून दयायची जबाबदारी ग्रुप प्रमुखाची राहील. बक्षीसासाठी तीन क्रमांक काढण्यात येतील. तर, स्पर्धेत सहभागी प्रत्येक ग्रुपला भेटवस्तू देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी सुजाता नखाते (९०११६७०२२०), तस्लिम शेख ( ७३५०४५०००७), मीना वराट (८४२१२११२८४), गायत्री विटकर (९८२२६२२०४८) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक हरेश खाते यांनी केले आहे.















