न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२२) :- चिंचवड येथील पी. एन. गाडगीळ अँड सन्स या सोन्याच्या दुकानात अज्ञात चोरट्याने ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडंट चोरून नेले. हा प्रकार शनिवारी (दि. २४) सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान घडला.
३२ वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.