न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२२) : प्रलंबित संदर्भ/अर्ज/तक्रारी यांचा निपटारा करण्यासाठी (दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर) या कालावधीत “सेवा पंधरवडा” राबविण्याचे निश्चित केलेले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या योजनेअंतर्गत “२८ सप्टेंबर” हा “माहिती अधिकार दिन” साजरा करण्यासाठी नागरी सुविधा केंद्र विभागामार्फत जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी तसेच माहिती अधिकाराचे कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आज (दि. २८) चिंचवडच्या ऑटो क्लस्टऱ येथे माहिती अधिकार कायदयाबाबत ओंकार पाटील (यशदा) यांचे व्याखान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम २००५ व महाराष्ट् लोकसेवा हक्क़ अधिनियम २०१५ बाबत जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी तसेच व RTI चे काम करणारे कर्मचारी यांना प्रत्यक्ष कामकाज करत असतांना येणाऱ्या अडचणी व शंकाचे निरसन व त्यांच्या मनातील प्रश्नांचे समाधान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटन महापालिका आयुक्त शेखर सिंह, अति. आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, उल्हास जगताप, यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सह.आयुक्त़ आशादेवी दुरगुडे, संदीप खोत, अति. आरोग्य वैदयकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहा. आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह.शहर अभियंता संजय कुलकर्णी, सहा. आयुक्त़ राजेश आगळे, सहा. आयुक्त़, सिताराम बहुरे, जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी तसेच इतर प्रशिक्षणार्थी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यशाळेचे आयोजन उप.आयुक्त, नागरी सुविधा केंद्र विठ्ठल जोशी यांनी केले होते. आभार प्रदर्शन माहिती व तंञज्ञान अधिकारी, नागरी सुविधा केंद्र अनिता कोटलवार यांनी केले.