न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२२) :- दोन वर्ष कालावधीसाठी तडीपार केलेल्या आरोपीने न्यायालयाची किंवा पोलीस उप-आयुक्त परिमंडळ दोन यांची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही.
तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच आरोपी हा शिंदे पेट्रोल पंपासमोरील सार्वजनिक रस्त्यावर हातात चाकू घेऊन मोठ्याने ओरडून तेथील लोकांमध्ये दहशत निर्माण करताना दिसला.
कुणाल वाल्मिकी (वय २६ वर्षे रा. श्रीकृष्ण नगर, एमबी कॅम्प, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी (दि २८) रोजी दुपारी ३.३० च्या दरम्यान पोलिसांनी केली. देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.