न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०२२) :- कोरोना काळानंतर प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात नवरात्र उत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहे. शहरात ठिकठिकाणी गरबा व रास दांडिया स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. चिंचवड परिसरातील बिजलीनगर – साईराज कॉलनी मधील उत्कर्ष मित्र मंडळानेही यंदाच्या वर्षी गरबा स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्यांना मानाच्या पैठण्यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, उमाकांत सोनवणे, रविंद्र चौधरी, विभागीय अध्यक्ष विशाल शेवाळे, विलास घाडगे, कैलास खैरनार, पंकज भिरुड यांची होती.
“सौभाग्यवती गरबा स्पर्धेमध्ये” प्रथम क्रमांक पुरस्कार तेजश्री झोपे ,द्वितीय क्रमांक भारती पाटील,व तृतीय क्रमांक शीतल भिरुड यांना मिळाला.मान्यवरांच्या हस्ते त्यांना पैठण्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात संयोजन व सहभाग भावना सोनवणे, मनीषा राणे,कल्पना खैरनार ,पुष्पा घाडगे,शीतल सरवदे,वैशाली निकम, अर्चना घोळवे, रेणू पाटील यांनी केले.
विजय पाटील म्हणाले,” बिजलीनगर चिंचवड हे उपनगर सध्या पिंपरी चिंचवड शहरातील जास्त घनता असलेले उपनगर म्हणून उदयास आलेले आहे. दाट वस्ती असलेल्या ह्या भागात विशेषतः कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो, अश्या मध्यमवर्गीय नागरी वस्तीमध्ये यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, दोन वर्षांच्या कॊरोना महामारी खंडानंतर महिला वर्ग आनंदाने हा सण साजरा करीत आहेत. स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन.”
कार्यक्रमाचे पैठणीचे पुरस्कर्ते सामाजिक कार्यकर्ते रवींद्र चौधरी हे होते. सुत्रसंचालन सुधिर राणे यांनी केले.


















