न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०२२) :- चिंचवड एमआयडीसीतील गरवारे टेक्निकल फायबर या कंपनीच्या पीपीएमएल डिपार्टमेंटच्या इलेक्ट्रिक पॅनलमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना आज बुधवारी मध्यरात्री दीड वाजता घडली. या आगीमुळे इ एस एल मशनरी, पॅकिंग मटेरियल, रॉ मटेरियलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बांधकामाला आगीच्या झळा बसल्याने भिंतीला व जिन्यातील काचा व पत्रे यांना तडे गेले आहेत.
पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्राचे तीन अग्निशमन वाहने, प्राधिकरण केंद्राकडून एक वाहन, चिखली केंद्राकडून एक वाहन, भोसरी केंद्राकडून एक वाहन व थेरगाव केंद्राकडून एक वाहन, असे एकूण ७ अग्निशमन वाहने घटनास्थळी पोहोचले.
पीएमआरडीए अग्निशमन केंद्राचे दोन, टाटा मोटर कंपनीचे एक अग्निशमन वाहन व एमआयडीसी अग्निशमन सेवा यांच्याकडील तीन अग्निशमन वाहने अशी १३ वाहने आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली होती. दोन तासात आग विझविण्यात आली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले आहे.