न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२२) :- पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ, चिंचवड विभागाचा दिवाळी कौटुंबिक स्नेह मेळावा गुरुवार (दि.२०) मोठ्या उत्साहात पार पडला. बिजलीनगर, चिंचवडगाव येथील प्रभु रामचंद्र मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या कौटुंबिक स्नेह मेळाव्यास मोठया संख्येने विक्रेते परिवारासह उपस्थित होते.
यावेळी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता पिसे, संघाचे प्रसिद्धी प्रमुख मनोज काकडे, हेमंत तांबे, विश्वस्त राजकुमार ढमाले, महादेव नेमाणे, विभाग प्रमुख अनिल नामदे, ज्येष्ठ विक्रेते सदाशिव जंगम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी सर्व प्रेस व्यवस्थापन, अधिकारी, वितरण प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांच्या हस्ते कार्यक्रमाचा ठिकाणी पणत्याची आरास करण्यात आली.आकाश कंदील, फुगे लावून परिसर सुशोभीत करण्यात आला. तसेच चिंचवड विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच सालाबादप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर आणि १० लाखांचा अपघात विम्याचे वाटप विक्रेत्यांना करण्यात आले. दीपावली निमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांना सोन्याचा नाण्याचे वाटप तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, प्रसिद्धी प्रमुख मनोज ककडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत सर्व उपस्थितांना दीपावलीचा शुभेच्छा दिल्या. तसेच नियमितपणे वृत्तपत्र वाचन करणारे वाचक बी.टी. महाजन आणि गोविंद पानसरे यांनी यावेळी आयुष्यात वृत्तपत्र वाचनाचे महत्व समाजावून सागितले.
यावेळी चिंचवड विभागाचा वतीने सालाबादप्रमाणे या ही वर्षी दिवाळी अंकाचे प्रकाशन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिवाळी भेटवस्तू व मिठाई चे वाटप करण्यात आले, स्नेह भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व विक्रेत्यांनी कठोर परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हर्षद राव, संदीप गिऱ्हे यांनी केले. अनिल दळवी यांनी आभार मानले.


















