- आ. श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच व श्री दिनेश लालचंद यादव मित्र परिवाराचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२२) :- आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच व श्री दिनेश लालचंद यादव मित्र परिवार यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे साफसफाई कर्मचारी, ड्रेनेज कर्मचारी, पोलीस बांधव, विद्युत कर्मचारी यांना मिठाई वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरात साफसफाई मध्ये सर्वात स्वच्छ म्हणून कुदळवाडी भाग अग्रस्थानी असतो. माजी स्वी. सदस्य दिनेश यादव यांनी प्रभागातील साफसफाई कामगार यांच्या बाबतीत असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कायम पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या बरोबर आ. महेश लांडगे यांनीही कायम एकमेकांना साथ देत कामगारांना सहकार्य केले आहे.
दिनेश यादव म्हणाले की, आमदार व भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. कोरोना काळातसुद्धा जीवाची पर्वा न करता प्रभागात चांगल्या प्रकारे कर्मचाऱ्यांनी सेवा केली. स्वतःच्या घरातील स्वच्छतेचे काम आणि प्रभागातील काम एकच आहे असे समजून कर्मचारी काम करत असतात. आपणास अविरत सेवा देत असतात याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत.
यावेळी किसन आप्पा यादव, चेअरमन दत्तात्रय मोरे, बाळासाहेब नेवाळे,लालचंद यादव, सुरेश वाळुंज,काका शेळके, दिपक घन, स्वराज पिंजण, प्रकाश चौधरी, पप्पू नेवाळे , निलेश यादव, गणेश यादव ,मोईद शेख,यांच्या हस्ते साफ सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, यांचा दिवाळीनिमित्त मिठाई देऊन सन्मान करण्यात आला व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रभागातील सर्व विभागांचे कर्मचारी आदी उपस्थित होते.


















