न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२२) :- आयआयबीएम कॉलेज पुणेमधील प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ यांना विद्यार्थी व पालकांच्या सिंघम पद्धतीने सर्व अडचणी दूर केल्याबद्द्ल लेडी सिंघम पुरस्कार देऊन संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर व सौ. शितलताई वर्णेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच सहशिक्षक कु. प्रेरणा कणावजे, सचिन बरबडे, शाहाबाज काझी, मिलिंद उशीर यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार २०२२ प्रदान करीत गौरविण्यात आले व संस्थापकांनी त्यांना पुढील शुभेच्छा दिल्या.
कु. प्रतिक्षा डफळ यांनी विद्यार्थिनींबाबतीतले प्रश्न समजून विद्यार्थिनींनी न घाबरता संकटाना सामोरे कसे जावे, तसेच येणारी संकटे किती भयानक येतात, पण आपण न घाबरता, न खचता सिंघम पद्धतीने निर्णय व जिद्द ठेऊन यशस्वी झाले पाहिजे, असे विद्यार्थीना घडविण्याचे काम केले. तसेच आयआयबीएम संस्थेसाठी एकनिष्ठ व प्रामाणिकपणे काम करून संस्थेच्या प्रगतीबाबत, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत असणाऱ्या जबाबदाऱ्या अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण केल्या, त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
तसेच आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत यांनी प्रतिक्षा डफळ या खूप मेहनती व धाडसी प्रवृत्तीच्या आहेत. संस्थांमध्ये असणाऱ्या अडचणी एक मुलगी असून विद्यार्थी व पालकांच्या सर्व जबाबदाऱ्या सिंघम पद्धतीने पूर्ण केल्या. त्यांना मिळालेला जो लेडी सिंघम पुरस्कार आहे, तो त्यांचा स्वकष्टाचा आहे, परंतु त्यांचे खरे सिंघम त्यांचे आई वडील हेच आहेत, असे संबोधले व पुरस्कराबद्दल आणि नवीन जबाबदार्यांबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्राचार्य प्रदीप फुलकर, विभागप्रमुख अमोल भागवत, प्रो. अनिकेत वंजारी यांनीही उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.















