न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२२) :- संगणमताने शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थाचा साठा आरोपींनी जवळ बाळगला. पोलिसांना याची माहिती मिळताच आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून १,९९,६० रूपयांचा पोत्यातील तंबाखू जन्य गुटखा, ३,५०,००० रूपये किंमतीची पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची टाटा एस चारचाकी गाडी (एमएच १४ एच टी०७३३), ५०० रूपये किंमतीचा साधा मोबाईल व ८,००० रूपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकुण ५,६१,४१० रू किं चा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिसांनी (दि. २) रोजी ११:४० च्या सुमारास कासारसाई पुसाणे रोड, पाचाणे गाव, मल्हार प्रोव्हिजन स्टोअर्स जवळ ता. मावळ येथे केली. फिर्यादी शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनचे समाधान लक्ष्मण फडतरे (वय ३० वर्षे) यांनी फिर्याद दिली असून आरोपी संतोष सोनु कटके (वय ४२ वर्षे रा. माळी आळी, घर नं ४५४५, जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे), शिवाजी सुदाम दरेकर (रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे), हणुमंत (रा. खालुंब्रे ता खेड पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. शिरगांव परंदवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.