- पिंपरी पोलिसांकडून दोघांवर गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२२) :- मोबाईल (नं ८१८०८२४३४२) वरून आरोपीने त्याचा आरोपी दुसऱ्या मित्राच्या व्हॉट्सअप (७०३८७३८७९१) वर मयत आरोपी पवन विष्णु लष्करे याचा फोटो व त्यासोबत ” ए दोस्त अपनी दोस्ती की मिसाल एक ना एक दिन जरून देंगे, चाहे कितने भी दिन गुजर जाए, तेरी मौत का बदला हम जरूर लेंगे ” असा आवाजाचा व्हिडीओ पाठविला.
तो करण भिमराव वंजारी याने त्याच्या स्टेटसवर ठेवुन समाजामध्ये दहशत पसरवुन सार्वजनीक शांततेचा भंग केला. पिंपरी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील मयत आरोपी पवन विष्णु लष्करे याच्या ग्रुपमधील हे आरोपी असुन त्यांच्याकडुन पुन्हा काहीतरी दखलपात्र अपराध घडण्याची शक्यता आहे. हा प्रकार (दि. २६/१०/२०२२) पासुन दि.०३/११/२०२२ पर्यंत आरोपीच्या मोबाईल स्टेटसव्दारे घडला.
फिर्यादी पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई मोहसीन रझ्झाक शेख यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी आतीश काळे (वय २५ वर्षे, रा. मोरवाडी, बौद्ध विहाराजवळ, पिंपरी), अर्जुन भिमराव वंजारी (वय २४ वर्षे, रा. जिजामाता होसींग सोसायटी, गल्ली नं. ६, शरद नगर, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.