न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२२) :- स्वीगी डिलेव्हरी देण्यासाठी दुचाकीस्वार त्याच्या दुचाकी (एम एच १४ जे एस ५१०७) वरून जात असताना रस्त्यात त्यांची दोन अनोळखी इसमांनी गाडी थांबवत ” ये थांब कुठे चाललाय ” असे विचारत काही कारण नसताना हातातील काहीतरी वस्तु फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले व पळुन गेले.
हा प्रकार (दि. ३) रोजी २:३५ च्या सुमारास विप्रो सर्कल शेजारी, फेज-३, हिंजवडी येथे घडला. फिर्यादी आकाश किसन घारे (वय २६ वर्ष, रा. डोणे, ता. मावळ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी २५ ते ३० वर्षीय दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.