न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२२) :- रस्त्याच्या कडेला उभे राहुन फिर्यादीचे वडील रंगनाथ नेरु राठोड (वय ६० वर्ष) हे शेळयाची राखण करीत होते. त्या दरम्यान स्वीफट कार (एम एच १४ बी आर ९५००) चालकाने कार भरधाव वेगाने वाहतुकीच्या नियमांकडे दुलर्क्ष करून चालवत फिर्यादीच्या वडिलांना पाठीमागून धडक दिली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला, उजव्या डोळयाजवळ, उजव्या हातास, घोटयाला व कंबरेला मार लागून ते गंभीर जखमी झाले.
आरोपी घटनास्थळी न थांबता निघुन गेला. ही घटना (दि. २) रोजी १६:३० वा. चे सुमारास संविधान चौक ते कृष्णानगर भाजीमंडई चौकाकडे जाणा-या रोडवर, चिखली येथे घडली.
फिर्यादी श्याम रंगनाथ राठोड (वय २५ वर्ष, रा. भिमशक्तीनगर झोपडपटटी, मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी स्वीफट कार (एम एच १४ बी आर ९५००) वरील चालक (नाव पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.