न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२२) :- नणंदेच्या आरोपी मुलाने फिर्यादीची १४ वर्षांच्या मुलीच्या मोबाईल क्रमांकावर (दि. १९) फोन केला. तसेच भैरवनाथ विदयालय, धावडेवस्ती, भोसरी येथे येवुन तिचा पाठलाग केला.
तसेच “तुला माझ्या सोबत बोलायचे नाही ना, ठीक आहे. मग मला आता तुझे घर, शाळा माहित झाली आहे, मी कधीही तुला उचलुन घेवुन जाईन, तुझे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करीन ” अशी धमकी दिली व तेथुन निघुन गेला.
याप्रकरणी ३२ वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी कृष्णा अर्जुन कांबळे (वय अंदाजे २५ वर्ष, रा. कार्ला, ता. मुखेड, जि. नांदेड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.