न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२२) :- पीएमआरडीए प्रधानमंत्री आवाससाठी १५ डिसेंबरला सोडत काढण्यात येणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामार्फत पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एलआयजी प्रवर्गातील ७९३ सदनिका व इडब्ल्यूएस प्रवर्गातील ३१ सदनिका तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील इडब्ल्यूएस (१ आर के) प्रवर्गातील ३६६ सदनिका व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ४१४ सदनिकांचा सर्व सुविधांनीयुक्त असा प्रकल्प साकारण्यात येत आहे. सदर गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी ऑनलाईन फॉर्म नोंदणीची समाप्ती झाली आहे.
पेठ क्र. १२ येथील एडब्ल्यूएस (१ बीएचके) प्रवर्गासाठी एकूण ३१६ लाभार्थ्यांनी व एलआयजीफ (२ बीएचके) प्रवर्गासाठी एकूण २६२ लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम भरून ऑनलाईन अर्जाची नोंदणी केली आहे. तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील इडब्ल्यूएसफ (१ आर के) गटासाठी एकूण ३७ लाभार्थ्यांनी व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गासाठी एकूण १५५ लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम भरून ऑनलाईन अर्जाची नोंदणी केली आहे.
सदर नोंदणीनुसारची प्रारूप यादी ७ डिसेंबर २०२२ रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार आहे. या यादीबाबत काही हरकत असल्यास संबंधितांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी या कार्यालयाशी संपर्क करावा. अंतिम प्रारूप यादी ही दि. १२/१२/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात येईल आणि लॉटरीची सोडत दि. १५/१२/२०२२ रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात पार पडणार आहे, अशी माहिती सहआयुक्त प्रशासन बन्सी गवळी यांनी दिली.